spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांना रेल्वे कडून अनोखे दिवाळी गिफ्ट !

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ह्या वर्षीची दिवाळी हि विशेषच त्यात काही शंका नाही कारण तीन वर्षांनंतरची निर्बंधमुक्त अशी हि पहिलीच दिवाळी आहे दिवाळी आहे. अश्या ह्या वर्षीच्या विशेष दिवाळीनिमित्त रेल्वेकडून मुंबईकरांसाठी विशेष गिफ्ट जरी करण्यात आला आहे म्हणजेच मुंबईकरांची दिवाळी आणि दिवाळीची खरेदी सुखराम करण्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक नसणार आहे ह्यामुळे २३ ऑक्टोबर रोजी (रविवारी ) दिवाळीच्या खरेदी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक नसला तरी उद्या रविवारचे वेळापत्रक लागू राहणार आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. दिवाळीचा सण सुरु झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. त्यात उद्या रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडणार. यावेळी मुंबईकरांना प्रवास करताना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.


रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी देशभरात मोठ्या उत्सवात दिवाळी सण साजरा केला जात आहे.

मुंबईत रेल्वेनं येणाऱ्या अथवा मुंबईतून रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ ठराविक स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरुपाची असेल. २२ ऑक्टोबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर या कालवाधीत महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर जाताना तिकीट काढूनच जावे लागणार आहे, अन्यथा दंड भरावा लागणार आहे.

रेल्वेकडून मुंबईतील मोजक्याच स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये सीएसएमटी , दादर , ठाणे , कल्याण , लोकमान्य टीळक टर्मिनस आणि पनवेल रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

 

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, हा तर भाजपचा…

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर

Ola Electric Scooter Launched : Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss