spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

बॅडमिंटन खेळत असताना एका तरुण व्यापाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तरुण जागेवरच खाली कोसळले, त्यानतंर त्याला उपचारासाठी परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सचिन तापडिया असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो परभणीतील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सचिन तापडिया यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुभ प्रसंही आनंदावर विरजण, लग्नघरात आगीच्या भडक्यात ५ जणांनाचा मृत्यू

सचिन तापडिया यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. अचानक मृत्यू झाल्यामुळे दोन लेकर पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे परभणी शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन यांची ड्रायव्हिंग स्कूल तर होतीच, शिवाय फायनान्स आणि इतर उद्योगांमध्येही ते सहभागी होते.

तरुणांनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे परिमाण वाढत चालले ?

आजकालच्या बहुतांश तरुणांची जीवनशैली अतिशय बिघडलेली आहे. कधीही झोपणे, केव्हाही अन्न खाणे या सवयींमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. व्यस्त दिनचर्येमुळे तरुणांना त्यांच्या जीवनशैलीकडे लक्ष देता येत नाही, पण ही चूक तुम्हाला हृदयविकाराचा झटका रुग्ण बनवू शकते.

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार आता सुखकर

तुमच्या दिनक्रमाचे वेळापत्रक खूप व्यस्त असले तरी, तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने सक्रिय असले पाहिजे. तुम्ही घरी राहूनही काही व्यायाम करू शकता. तसे, योगाची दिनचर्या तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. योगामुळे आपले शरीर निरोगी राहते आणि मानसिक शांतीही मिळते. भरपूर फळे, हिरव्या भाज्या खा आणि फक्त घरगुती अन्न खा, भरपूर पाणी प्या.

Latest Posts

Don't Miss