MPSC मध्ये पाच हजार मुलांमधून कल्याणच्या अभिषेकचा प्रथम क्रमांक

MPSC मध्ये पाच हजार मुलांमधून कल्याणच्या अभिषेकचा प्रथम क्रमांक

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत गट ब आणि गट क तसेच गट ड पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. MPSC ने परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी परीक्षा आयोजित केल्या होत्या ह्या परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये पार पडल्या. या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते ,त्यातून २४० जणांची निवड करण्यात आली आणि या संपूर्ण ५००० मुलांमधून कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात राहणारा अभिषेक सालेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अभिषेक हा वडील भास्कर सालेकर आणि आई श्रध्दा सालेकर यांच्यासोबत राहतात. अभिषेकाचे वडील भास्कर सालेकर आणि आई श्रध्दा सालेकर हे दोघेही
शिक्षक असल्यामुळे अभिषेकला शाळेपासूनच अभ्यासामध्ये आईवडिलांचं सहकार्य लाभल. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत त्याने स्वतःची अभ्यासातली आवड व सक्षमता ओळखली होती व सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध केले होते . त्यानंतर अभिषेकला मागे वळून पाहावे लागलेच नाही.

आई वडील शिक्षक असल्यामुळे शिक्षणाबद्दलची आवड अभिषेककडे असणं हे स्वाभाविकच होत. त्यात अभिषेकाचे आजोबाही बीएआरसीमध्ये कार्यरत असल्यामुळे आपणही आजोबांसारखं सरकारी अधिकारी बनून जनसेवा करावी अशी इच्छा अभिषेकची होती. आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते.आजोबांच आदर्श ठेऊन त्यांच्यासारखाच अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत अभिषेकने जिद्दीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केलं. बीए मॅकेनिकलपर्यंत शिक्षण पूर्ण केला त्यानंतर एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मार्च २०२० मध्ये त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पहिला प्रयत्न केला त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि परीक्षा लांबणीवर गेली.मात्र अभिषेक कुठेही डगमगला नाही .

परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्याचबरोबर खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली. एमपीएससीच्या परीक्षा जाहीर झाल्या. एमपीएससीची परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी ही परीक्षा होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये ही परीक्षा होणार होती. अभिषेकने दिवसातील १३ तास अभ्यास केला. अभिषेकला त्याचे आई वडिलांची साथ व मार्गदर्शन मिळत होते. २१ तारखेला अभिषेकच्या वाढदिवस होता व त्याच दिवशीच निकाल जाहीर झाला.

आपण चांगल्या मार्कने उत्तीर्ण होणार असा विश्वास अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता, मात्र राज्यात प्रथम क्रमांक मिळेल असे वाटले नव्हते. तब्बल पाच हजार मुलं परीक्षेला बसली होती. त्यातून अभिषेकने बाजी मारली. अभिषेकच्या यशानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. या यशाबद्दल बोलताना अभिषेक याने नियमित आणि नियोजनबद्ध अभ्यासामुळे हे यश मिळाले. आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडिलांना आहे. ते शिक्षक असून त्यांनी लहानपणापासूनच आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित केले. त्या अनुभवाचा फायदा नक्कीच झाल्याचे त्याने सांगितले. आजवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे त्याने आभार मानले.

हे ही वाचा:

मोदी सरकारची मोठी घोषणा; ७५ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरीचं ऑफर लेटर

IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version