spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बस चालकाच्या चुकीने बुलढाण्यात अपघात

सध्या अपघाताचे जणू काही सत्रच चालू आहे. यातच समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून तर अपघात सत्रात वाद होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळच्या सुमारास अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यात (Buldhana) जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला (Private Bus) अपघात झाला.

सध्या अपघाताचे जणू काही सत्रच चालू आहे. यातच समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून तर अपघात सत्रात वाद होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळच्या सुमारास अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यात (Buldhana) जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला (Private Bus) अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी ७. १५ वाजता अपघात झाला. बसमध्ये ३५ प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे.

तर लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर काल ७ सप्टेंबर रोजी एसटी बस आणि शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये चालकासह १७ मुलं जखमी झाले आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात. जखमींना उपचारांसाठी जालन्यात हलवण्यात आलं आहे. सहकार विद्यामंदिर शाळेतील मुलं दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जात होती. परंतु त्याचवेळी मांडवा गावाजवळ एसटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट शाळकरी मुलांच्या वाहनाला धडकली. या अपघातात चालकासह १७ मुलं जखमी झाली आहेत. अपघातातील जखमी मुलं ही ६ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत.

हे ही वाचा: 

उद्धव ठाकरे यांचा अहमदनगर येथे दुष्काळ दौरा

मुंबई- ठाण्यात एकूण १२४ गोविंदा जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss