डोंबिवलीहून निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा Mumbai Pune Express Way वर भीषण अपघात; ५ ठार, आठ गंभीर जखमी

डोंबिवलीहून निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा Mumbai Pune Express Way वर भीषण अपघात; ५ ठार, आठ गंभीर जखमी

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर (Pandharpur) कडे रवाना होत आहेत. परंतु, डोंबिवलीहून निघालेल्या या वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात झाला. रात्री एकच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Express Way) पंढरपुरच्या दिशेने निघालेल्या या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्सवरचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे ट्रॅव्हल्स थेट ३० ते ४० फूट खड्यात जाऊन कोसळली. यावेळी. ट्रॅव्हल्समध्ये ५४ प्रवासी प्रवास करत होते. यामधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यात ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, तात्काळ बचावकार्यास सुरुवात झाली. सर्व जखमींना एमजीएम रुग्णालय आणि पनवेल ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी आहे. असे असतानाही एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टर आलाच कसा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, “मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी बसचा अपघात होऊन पंढरपूरला निघालेले काही वारकरी मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी बातमी आहे. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सुखरुप घरी परत जावे ही प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल जवळ खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाल्याचे वृत्त समजले. ही बस डोंबिवली येथून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून, जवळपास 40 भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.”

हे ही वाचा:

‘केदारनाथमधून २८८ किलो सोने गायब झाले’, अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आरोप, पंतप्रधान मोदींच्या…

Ashadhi Ekadashi 2024: Central Railway चे भाविकांना खास गिफ्ट, सोडणार ६४ विशेष गाड्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version