महाराष्ट्रातल्या लालपरीचा मध्यप्रदेशात अपघात, 13 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

महाराष्ट्रातील जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही लालपरी पुरावरून खाली कोसळून या अपघातात तेरा प्रवाशांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या लालपरीचा मध्यप्रदेशात अपघात, 13 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

महाराष्ट्रातल्या लालपरीचा मध्यप्रदेशात अपघात

मध्यप्रदेश : महाराष्ट्रातल्या एसटीचा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही लालपरी पुरावरून खाली कोसळून या अपघातात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश मधील धार येते हा अपघात झाला असून, तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस पुलाचा कठाळा तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात आलेले आहे. तर अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

सध्या घटनास्थळी मदत कार्य व बचाव कार्य सुरू असून अपघाता संदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने हेल्पलाइन नंबर संपर्क साधला. त्याचबरोबर जळगाव अधिकारी कार्यालयाकडून देखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडल्याने पैकी आठ जणांची ओळख पटवण्यात यश आले.

हेही वाचा : 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाजप नेते चंद्रकांत पाटिल यांची प्रतिक्रिया

मध्य प्रदेशातील या दुर्घटनेत बस अपघातात मृत्युमुखी पडलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी मंडळाला दिले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशातील घडलेल्या एसटी अपघातानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन घटनास्थळी दाखल होणार असून, अपघाता संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहेत.

Exit mobile version