spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा नवले पुलावर अपघात; दुभाजकाला धडकला कंटेनर

पुण्यातील (Pune) नवले पुलावरील (Navle Bridge) अपघाताचं सत्र संपत नसल्याचं चित्र आहे. नवले पुलावर पुन्हा एकदा अपघाताची (Accident) घटना घडली. या अपघातात तीन ते चार वाहनांचं नुकसान झालं. रविवारी झालेल्या भीषण अपघाताच्या जागीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीव्र उतारावर कंटेनरने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाला असून त्यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.

महामार्गावर नुकत्याच झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पुन्हा कंटेनरने पुढे चाललेल्या कारला धडक दिली. माशांचे खाद्य घेऊन जाणाऱ्या या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. दरम्यान या धडकेमुळे कंटेनर दुभाजक तोडून दुसऱ्या लेन मध्ये घुसला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या कारमधील कुटुंब कोल्हापूरहून लोणवळा येथे जात होते.

हे ही वाचा : 

IND vs NZ : टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली

शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार: नाना पटोले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss