लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर होणार ‘अपसंपदा’कडून कारवाई?

किरण लोहार यांनी त्यांच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ५० कोटींपेक्षा (50 crores) जास्त संपत्ती जमावल्याची माहिती एसीबीला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता तपासामध्ये गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास त्यांच्या वर 'अपसंपदा' विभागाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर होणार ‘अपसंपदा’कडून कारवाई?

गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हापरिषदे (Solapur District Council) चे शिक्षणाधिकारी किरण लोहार (Education Officer Kiran Lohar ) २५ हजार (25 Thousand) रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना एसीबीच्या (Anti Corruption Bureau) हाती लागले होते. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासोबत अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागा (Bribery Section) ने सापळा रचून ताब्यात घेतले होते. लाचखोरीमुळे किरण लोहार यांनी त्यांच्या कार्यकारणीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) ते सोलापूर (Solapur) फक्त वाद निर्माण केले होते. ग्लोबल टीचर अवॉर्ड (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले (Ranjit Disley) गुरुजी यांच्यावर आरोप केल्यानंतर किरण लोहार चर्चेत आले होते.

किरण लोहार यांनी आता पर्यंत शिक्षण खात्यात (Education Department) केलेल्या उलाढालींचा आता खुलासा करण्यात येणार आहे. किरण लोहार यांनी त्यांच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ५० कोटींपेक्षा (50 crores) जास्त संपत्ती जमावल्याची माहिती एसीबीला सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता तपासामध्ये गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास त्यांच्या वर ‘अपसंपदा’ विभागाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, किरण लोहार ऑक्टोबर २०२२ मध्ये लाच घेताना रंगेहात पकडले गेले होते. त्याआधी १३ महिन्यांपूर्वी त्यांची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी त्यांनी कोल्हापूर आणि रत्नागिरी (Ratnagiri) विभागामध्ये काम होते. कोल्हापूरमध्ये काम करत असताना त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्येच त्यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांकडून करण्यात आले होते. त्यामुळे त्यावेळी किरण लोहारांना कार्यमुक्त (work free) करण्याचा ठराव कोल्हापूर जिल्हापरिषदेने घेतला होता.

सप्टेंबर (September) २०१८ मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालया (Office of the Commissioner of Education) ने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी (Secondary Education Officer) व शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) या दोन्हीपदांवरून कार्यमुक्त केले होते. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा (Legal fight) देत कारवाईला स्थगिती (adjournment) देखील मिळवली होती.

हे ही वाचा:

केंद्राला सुप्रीम दिलासा, नोटबंदी सरसकट अयोग्य ठरविली जाऊ शकत नाही

Shubhvivah मालिकेत कुंजिका काळविंट साकारणार भन्नाट पात्र, नव्या वर्षात दमदार सुरुवात

Watch Video, कडाक्याच्या थंडीत चक्क हरणाचं तोंड गोठलं, पहा ‘कसा’ वाचवला जीव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version