“राजकारण नसून तीर्थयात्रा आहे”; आदित्य ठाकरेंनी केलं वक्तव्य

रामाचे दर्शन घेताना महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल असा ठाम विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

“राजकारण नसून तीर्थयात्रा आहे”; आदित्य ठाकरेंनी केलं वक्तव्य
शिवसेना नेते युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज अयोध्याला जाऊन राम जन्मभूमीवर रामाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ११ वाजता आदित्य ठाकरे लखनऊ एअरपोर्ट ला पोहचले. आदित्य यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी होल्डींग लावण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांनी सर्वात आधी इस्कॉन येथे जाऊन श्री कृष्णा चे दर्शन घेतले.
त्यानंतर हनुमान गढी येथे जाऊन सुद्धा दर्शन घेतले. भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यांनी परिसर भगवामय झाला होता. रामाचे दर्शन घेताना महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल असा ठाम विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. अयोध्याला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठी १०० खोल्यांची सोय करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याशी संवाद साधणार आहेत.
अयोध्याला आम्ही राजकारण करायला आलो नाही, ही राजकारण यात्रा नसून एक तीर्थ यात्रा आहे. अयोध्या हे भारताशी जोडलेलं पवित्र बंधन आहे असं आदित्य ठाकरेंनी मत व्यक्त केलं. त्यानंतर सायंकाळी आदित्य ठाकरे यांनी शरयु नदीच्या तिरावर महाआरती केली.  नदी काठी भगवे झेंडे फडकत होते. हजारो शिवसैनिक तसेच अयोध्यातील नागरिकांनी महाआरतीला सहभाग नोंदवला.
Exit mobile version