spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Crime News : ३५ तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट, तरुणीच्या हत्येचा पाच महिन्यांनी उलगडा

दिल्लीत सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण दिल्लीसह देश हादरल आहे. साधारणतः पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच, मे २०२२ मध्ये एक हत्या झाली होती. आता या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. यामध्ये या प्रकरणातील मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. दिल्लीत पाच महिन्यांपूर्वी एका तरुणीची हत्या झाली होती. याच प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला असून याप्रकरणी एका आरोपीलाही अटक केली आहे.

श्रद्धा वॉकर आणि आफताब अमीन पूनावाला दोघेही पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. श्रद्धाचे वडील विकास मदान वॉकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वॉकर आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामाला होती. तिथेच आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धाची भेट झाली. श्रद्धा आणि आफताब एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर आफताब आणि श्रद्धा मुंबईतून दिल्लीत राहायला गेले. दिल्लीत राहायला गेल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्न करण्याबाबत मागणी केली त्यानंतर, राग आल्यानं आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात नेऊन फेकले.

हेही वाचा : 

Sunil Shende : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

पोलिसांनी टेक्निकल सर्विलांसच्या मदतीनं आरोपी आफताबला शोधून काढलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. आफताबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आरोपी आफताबनं चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने लग्न करण्याचा तगादा लावला. त्यानंतर वैतागलेल्या आफताबनं रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. १८ मे रोजी आरोपी आफताबनं श्रद्धाची धारदार चाकूनं हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे केले. ते तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरांत टाकून दिले. आरोपी आफताबच्या चौकशीनंतर पोलिसांनी काही अवशेष जंगलातून ताब्यात घेतले. सध्या आरोपी आफताब पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

हत्या झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडिल ५९ वर्षीय विकास मदन वॉकर यांनी ८ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील मेहरौली पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या अपहरणाचा एफआयआर दाखल केला होता. वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या कुटुंबीयांसह पालघरमध्ये राहत होते. श्रद्धा वॉकर ही २६ वर्षीय होती.

Children Day 2022 : बालदिनानिमित्त चाचा नेहरू आणि बालकांच्या काही खास आठवणी

Latest Posts

Don't Miss