Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मुंबईत कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा संसर्ग, ४ रुग्ण गंभीर

मुंबईत इन्फ्लूएंझा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाइफ सपोर्टवर आहेत. शहरात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वांची सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र आता मुंबईत अजून एका रोगाने डोकं वर काढलंय आणि तो रोग म्हणजे स्वाईन फ्लू. नुकत्याच समोर येत असलेल्या माहितीनुसार मुंबईत इन्फ्लूएंझा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाइफ सपोर्टवर आहेत. शहरात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी केल्यावर जर ती निगेटिव्ह आली तर अशा लोकांनी H1N1 चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर सामान्य नागरिकांना देत आहेत.
जुलैमध्ये एकूण ११ इन्फ्लूएंझा H1N1 रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर, जूनमध्ये हीच रुग्णांची संख्या कमी म्हणजे 2 रुग्ण इतकी होती. तसेच दररोज किमान २ ते ३ नव्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती समोर येत आहे.कोरोनाप्रमाणे H1N1 हा श्वसनाचा आजार असून स्वाईन फ्लूचा कोरोनाप्रमाणे २०१९ मध्ये जागतिक महामारी म्हणून प्रादुर्भाव दिसून आला होता.
गेल्या आठवड्यात राज्यात H1N1 मुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 10 जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. स्वाईन फ्लूने बाधीत झालेल्या व्यक्तीला ताप, नाक वाहणे, अंगदुखी, वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणं दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसून आल्यास लगेच चाचणी करून घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss