spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृषिमंत्री पद मिळताच धनंजय मुंडे यांनी घेतला निर्णय…

अजित पवार यांनी बंद पुकारल्यानंतरत्यांच्यासोबत ८ आमदार देखील त्यांच्यासोबत आले. आणि त्यांनतर राजकारणात नवीन चर्चाना उधाण आले. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बाकीच्या आमदारांचा देखील शपथ विधी सोहळा पार पडला.

अजित पवार यांनी बंद पुकारल्यानंतरत्यांच्यासोबत ८ आमदार देखील त्यांच्यासोबत आले. आणि त्यांनतर राजकारणात नवीन चर्चाना उधाण आले. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर बाकीच्या आमदारांचा देखील शपथ विधी सोहळा पार पडला. त्यांच्या सोबत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या वाट्याला कृषिमंत्रीपद आले आहे. कृषिमंत्री पद मिळताच धनंजय मुंडे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. बीड (Beed) जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने मुंडे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाच्या एक दिवस आधीच मंत्रीपद मिळाल्यावर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आल्याने धनंजय मुंडे ‘ग्रँड वेलकम’ करण्यात आले.

धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी त्यामुळे दीड-दोन टनाचे हार, बनवले गेले. कुठे जेसीबीने दोन टनाचे फुलांचे भलेमोठे हार, तर कुठे जेसीबीनेच फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी अन् सर्वत्र जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी डिजीटल बॅनर, या ‘ग्रँड वेलकम’चे मानकरी राष्ट्रवादीचे मंत्री असलेले धनंजय मुंडे होते.असे ‘ग्रँड वेलकम’चा कार्यक्रम पार पडला. राज्यामध्ये जर जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असतील तर त्या बीड जिल्ह्यात. त्यामुळे या आत्महत्या कशा कमी होतील याकडे जास्त लक्ष देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, राजकारणात आल्यावर मुंडेंची दुसऱ्या इनिंगची ही ग्रँड सुरुवात म्हणून समर्थकांनी असे अभूतपूर्व स्वागत केले आणि मुंडेंनी देखील ते स्वीकारले. आठ-दहा जेसीबीने ‘ग्रँड वेलकम’ स्वीकारणाऱ्या धनंजय मुंडेंना कृषी पदाची जबाबदारी मिळाल्यावर मराठवाड्यात समाधानकारक पाऊस असल्याचे कळाले का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही, त्यामुळे १५ जुलैला असलेला माझा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले. मग हाच निर्णय एकदिवस आधी का घेतला नसावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १३ तारखेला त्यांना कृषिमंत्रीपद मिळाले नसले तरीही, ते राज्याचे मंत्री होतेच. मग असा निर्णय कृषिमंत्री पद घेतल्यावर का घेण्यात आला आहे. याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस झालाच नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र अजूनही अनेक भागात अपेक्षित पाऊस झालेलं नाही. काही ठिकाणी पेरण्याच झाल्या नाही तर काठी ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. तर काही प्रकल्पात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्याची देखील अशीच काही परिस्थिती आहे.

हे ही वाचा:

भारतीयांसाठी नवीन बाजारपेठ खुली होणार ,नरेंद्र मोदी

एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी…, राष्ट्रवादीने केले मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss