spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यापाठोपाठ अमरावतीतून देखील समोर आला बेपत्ता मुलींचा धक्कादायक आकडा समोर…

अमरावती जिल्ह्यात देखील ३ महिन्यात २७२ महिला आणि मुली तर अमरावती विभागात तब्बल ८१२ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत.

खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी पावनीत कौर अशा विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिलांच्या हाती धुरा असणारा जिल्हा म्हणजे अमरावती. पण, याच जिल्ह्यातून धक्कादायक बाब समोर येत आहे आणि ती म्हणजे पुण्यापाठोपाठ आता अमरावतीतून देखील गेल्या तीन महिन्यात तब्बल २७२ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर अमरावती विभागात हा आकडा तब्बल ८१२ इतका आहे अमरावती विभागात बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

पुण्यातदेखील ८४० महिला बेपत्ता…

तिला काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या नोंदी वाढत आहे. त्याबाबतच्या तक्रारी वाढत आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुली या महाराष्ट्रातून बेपत्ता होत आहेत. सध्या जरी अमरावतीतून हा आकडा समोर येत असला तरी यापूर्वी पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुली बेपत्ता झाल्या होत्या. पुण्यातील आकडेवारी सांगायची झाली तर पुणे जिल्ह्यात गेल्या ७ महिन्यात जवळपास ८४० महिला बेपत्या झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्या पाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यात देखील ३ महिन्यात २७२ महिला आणि मुली तर अमरावती विभागात तब्बल ८१२ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत.

बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे घरची प्रतिष्ठा धुळीला मिळू नये म्हणून अनेकदा मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली जात नाही. त्यामुळे या आकड्या व्यतिरिक्त अजून किती मुली बेपत्ता झाल्या आहेत हे ठोसपणे सांगणे शक्य नाही. मुली बेपत्ता होण्याचा आकडा जरी मोठा असला तरी त्या मागची नेमकी कारणं अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाहीत.

 

Latest Posts

Don't Miss