विधिमंडळाच्या कामकाजाला समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम

महाराष्ट्रामधील पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु झाले असून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. राज्यामधील सध्या पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे.

विधिमंडळाच्या कामकाजाला समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम

महाराष्ट्रामधील पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु झाले असून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. राज्यामधील सध्या पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये याचा परिणाम दिसून आला आहे. मुंबईसह कोकणामध्ये सुद्धा पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला देखील बसणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र अधिवेशन ठरलेल्या तारखेला संपणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. पण अधिवेशन लवकर संपवा ही चर्चा अचानक सुरू झाली होती. पहिल्याच दिवसांपासून शांततेत सुरू असलेले हे अधिवेशन लवकर गुंडाळले जाईल अशी चर्चा गुरुवारी सकाळपासूनच सुरू झाली होती.

आमदारांनी तशी मागणीही केली होती. भाजप आमदार संजय कूटे यांनी तर आपण तशी विनंती सभागृहात करणार असल्याचे माध्यमांना सांगून टाकले. राज्यातील अनेक भागात सध्या पूरस्थिती आहे. ज्या भागात पूरस्थिती आहे त्या भागातले आमदार, पालकमंत्री अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशन सुरू असल्याने अधिकारीही अधिवेशनात व्यस्त आहेत. अधिवेशनामुळे इतर यंत्रणावर ताण पडत असल्याने अधिवेशन संपवून ही यंत्रणा पूरस्थितीसाठी कामाला लावावी अशी आमदारांची मागणी होती. दरम्यान एकिकडे अधिवेशन लवकर संपवण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मात्र सरकारवर टीका करत अधिवेशन न संपवण्याची मागणी केली होती.

सकाळपासून सुरू असलेल्या चर्चेला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम मिळाला. दुपारी तीन वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अधिवेशन ४ ऑगस्ट रोजी संपणार असल्याची माहिती समोर आली. सोमवार आणि मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनाला सुट्टी जाहीर करण्यात आली. शनिवार आणि रविवारी विधिमंडळाचे कामकाज बंद असते. आता, सोमवार आणि मंगळवारदेखील सुट्टी देण्यात आली. राज्यातील पावसाची परिस्थिती बघता सर्व आमदारांना शनिवार ते मंगळवार आपल्या मतदारसंघात या निमित्ताने जात येणार आहे.

हे ही वाचा:

ODI मालिकेला आजपासून सुरुवात, पहिला सामना भारतासाठी लकी की अनलकी

उद्धव ठाकरेंनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

नागपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version