spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जालन्यातील घटनेनंतर ‘या’ ठिकाणांहून सुटणाऱ्या सर्व एसटी बस रद्द…

जालन्यामध्ये (Jalna) झालेल्या लाठीचार्जनंतर (Jalna Maratha Protest) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

जालन्यामध्ये (Jalna) झालेल्या लाठीचार्जनंतर (Jalna Maratha Protest) राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला (Maratha Reservation Movement) राज्यात हिंसक वळण लागल्यानं याचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसलाय. लाठीचार्जच्या निषेधार्थ सर्वत्र बंदची हाक देण्यात आली. या बंदमुळे एसटीचं सुमारे १० कोटींचे नुकसान झाले आहे. त्यातच आज राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच एसटीने (ST) सर्व विभाग नियंत्रकांना पोलिस यंत्रणेच्या संपर्कात राहण्याचे आदेशही दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन मगच डेपोतून एसटी काढावी, अशाही सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आल्यात. जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, पंढरपूर, अहमदनगर, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतील ४६ आगारांतील वाहतूक बंद ठेवल्याने महामंडळाला आठ ते दहा कोटींचे नुकसान झालंय.

जालन्यातील घटनेनंतर सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातून (Pune) सोलापूर, जालना, धुळे, नगर, संभाजीनगर, लातूर अवसा या गावात जाणारी एकही बस सुटलेली नाही. या मार्गावर दररोज सहाशे साडेसहाशे बसेस धावतात..रोज १३,००० ते १५,००० प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये, याची काळजी घेत या बस पुण्यातच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे. जालना मधील लाठीमार प्रकरणी आज सातारा (Satara) जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या एस टी महामंडळ विभागाला सातारा पोलिसांनी सतर्क केले. सातारा पोलिसांनी कराड, सातारा, पुणेकडे जाणारी वाहतूक थांबवण्याच्या सांगली एस टी विभागाला ९.०० वाजता दिल्यात सूचना. सांगली जिल्ह्यासह अन्य ठिकाणची एस टी वाहतूक मात्र सुरळित चालू राहणार आहे. सकाळी शिवशाहीच्या दोन बस केवळ पुण्याकडे रवाना झाल्यात. आता नवीन बसेस कराड, सातारा, पुण्याकडे न सोडण्याचा सांगली विभागाने घेतला निर्णय घेतला आहे. दुपारनंतर परिस्थिती पाहून वाहतूक सुरु करण्याचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली नेरलेकर (Vrushali Nerlekar) यांनी दिली आहे.

कोल्हापुरातून (Kolhapur) सातारा-पुणे-मुंबईसाठी जाणाऱ्या एसटी बंद करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात आंदोलन असल्याने या मार्गावरील वाहतूक राहणार बंद करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या उद्रेकानंतर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात जाळपोळीच्या घटनेनंतर जालना जिल्ह्यातील बस वाहतूक एक तारखेपासून बंद आहे. परिणामी शेकडो बस जालना बस स्थानकातील डेपोमध्ये उभ्या आहेत. यामुळे बस स्थानकावर देखील शुकशुकाट आहे जालन्यातील घटनेनंतर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील बस सेवा ठप्प, हिंगोलीमधील ६६० बस फेऱ्या रद्द, दररोज ३० लाख रुपयांचं नुकसान तर प्रवाशांचे हाल.

हे ही वाचा: 

निहारिका रायजादा हिचा बोल्ड आणि आकर्षक अंदाज पाहा…

वाडगाभर सायीचे आता घरीच करा रवाळ साजूक तूप, घरच्या घरी तूप बनवणे आता सोपे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss