दोन वर्षांनी वारकरी देहूमध्ये जमल्याने देहूनगरी दुमदुमली

"ज्ञानोबा तुकाराम" अशा घोषणा देत टाळ मृदुंगात हरवून जाऊन वारकरी आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहेत.

दोन वर्षांनी वारकरी देहूमध्ये जमल्याने देहूनगरी दुमदुमली
कोरोनाच्या महामारी मुळे गेली 2 वर्षे पंढरपूरची यात्रा झाली नव्हती. कोरोनाच्या निर्बंधांमुळे वारकऱ्यांना एसटी मधुन पंढरपूर यात्रा करावी लागली होती. मात्र आता कोरोनाचे निर्बंध बऱ्यापैकी हटले असून आता पुन्हा “ज्ञानोबा तुकाराम” अशा घोषणा देत टाळ मृदुंगात हरवून जाऊन वारकरी आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहेत. यावर्षी कोणतेही निर्बंध वारीवर नसल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्नी पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्या सह बारामती हायटेक टेस्कस्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ मृदुंगात दंग झाले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वारकऱ्यांच्या राहण्यासाठी उत्तम सोयी देखील ठिकठिकाणी केल्या आहेत.
राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत किमान 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोविड काळानंतर दोन वर्षांनी आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा विना अटींमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळं वारकऱ्यांमध्ये वारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Exit mobile version