औरंगाबादमध्ये उमटले जालन्यातील घटनेचे पडसाद

जालन्यातील (Jalna) घटनेचे संपूर्ण राज्याभर पडसाद उमटले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजने उपोषण केले होते.

औरंगाबादमध्ये उमटले जालन्यातील घटनेचे पडसाद

जालन्यातील (Jalna) घटनेचे संपूर्ण राज्याभर पडसाद उमटले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजने उपोषण केले होते. तेव्हा आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी आंदोलकानावर लाठी मार करण्यास सुरुवात केली. या घटनेचे पडसाद जालना जिह्ल्याच्या शेजारील औरंगाबादमध्ये (Aurangabad) सुद्धा दिसून आले. औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री बस जाळण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादमधील इतर शहरात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

जालना जिह्ल्यातील सराटी गावामध्ये मराठा समाज मागील चार दिवसापासून आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी बसले होते तेव्हा उपोषण करणाऱ्या आंदोलकानावर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. औरंगाबादच्या बिडकीन गावात टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर देवळाई चौकाजवळ रस्ता रोको आंदोलन करून टायर पेटवण्यात आले. शहरातील मुख्य बस स्थानकात बस पेटवून देण्यात आली.आज या संपूर्ण जिह्ल्यात शांतता असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर सकाळी १० आणि ११ वाजता मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रवादीकडून क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. वाळुंजमध्ये मराठा समाजाच्या वतीने सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. १२ वाजता सकल मराठा समाज गंगापूर तालुकाच्या वतीने आंदोलन करणार आहेत. आज सकाळी जालना येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा करण्यात येणार आहे. जालना येथे शांतपणे चालू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी मारकेल्यामुळे सगळीकडे वातावरण चिघळे आहे. याचे परिणाम संपूर्ण राज्यभर दिसून येत आहेत.

Exit mobile version