spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अफझल खान कबरप्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात, कबरीभोवतलच्या अतिक्रमणावर सरकारने केलेल्या कारवाईविरोधात याचिका

सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रतापगड किल्ल्याजवळ अफझलखानाची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफझलखानाला मारले होते त्याच अफझलखानाची ही कबर आहे. काल या कबरीभोवतलच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू झाली. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान हिंदवी स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफझलखान यांच्या कबरी उद्ध्वस्त कराव्यात, अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. परंतु अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अॅड. निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली. सरन्यायाधिशांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आले. कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकला कोणताही धक्का लागणार याची काळजी घ्यावी असे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. परंतु खंडपीठाने गुरूवारी कोणताही आदेश आत्ता देण्याऐवजी या संदर्भात आम्ही सविस्तर शुक्रवारी सुनावणी करू असे म्हटले होते. त्यामुळे आज नेमकं काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

अतिक्रमण नव्हे, कबरच काढा, अशी मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूचनेनुसारच बांधण्यात आलेल्या अफझल खानाच्या कबरीवरुन गदारोळ सुरु आहे. ‘कबरीसाठी जागा देण्यामागील महाराजांची मते काही वेगळी असतील, पण स्वराज्याच्या शत्रूला या भूमीत जागाच असता कामा नये’ असं वक्तव्य हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी गुरुवारी केलं होतं.

तर दुसरीकडे शिवप्रतापदिनी कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर चोख पोलीस बंदोबस्तात गुरुवारी कारवाई करण्यात आली. दरम्यान गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच ही कारवाई का केली गेली नाही, असा सवालही शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.

Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचिश जयवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफझल खान कबर परिसरात काही खोल्यांचा बेकायदेशीरपणे निर्माण करण्यात आला होता. हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आलीय. १५ ते २० गुठ्यांच्या परिसरात हे काम करण्यात आलं असून ही जागा वनविभागाच्या अखत्यारीत येते, असाही दावा केला जातोय.

राशी भविष्य ११ नोव्हेंबर २०२२, तुमच्या मनातील संशय आणि संभ्रम दूर होण्याची आवश्यकता आहे

Latest Posts

Don't Miss