spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात, जयंत पाटील उद्या घटनास्थळी जाणार

मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed in Malvan : नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 35 फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे घाईगडबडीत केलेले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचणारे ठरले. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन याविरोधी आंदोलनाचा पुकारा दिला आहे. उद्या, दि. २८ ऑगस्ट २०२४, सकाळी ११.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ हे आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते, असे विधान संजय राऊतांनी केले. हात लावीन तिथे सोनं होतं, अशी मराठीत म्हण आहे. पण पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते. अयोध्याच्या राम मंदिरात गळती होत आहे. नवीन संसद भवनाला गळती लागली आहे. ज्या पुलांचे उद्धाटन केले, ते पूल उध्दवस्त झाले आहेत. कोस्टल रोडला गळती लागली आहे. अटल सेतूला भेगा पडल्यात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पाहिलं तर तोही उद्धवस्त झाला. गेल्या ७० वर्षात हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील, त्यांनी जिथे जिथे हात लावला ते उद्धवस्त झाले आहे. देशही उद्धवस्त होत आहे.

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss