spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत- दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट ….

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चर्चेत असलेले पहायला मिळतात. कधी ते बॉलीवूड बॉयकॉटवर बोलतात तर कधी हिंदू-मुस्लीम वादावर. पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम वादाला छेडून ते सर्वांच्या नजरेत आले आहेत. शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी त्यांनी ईस्ट लीसेस्टर पोलिसांच्या एका ट्वीटला रीट्वीट करत आपल्या मनातला राग बाहेर काढला आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यानंतर वातावरण थोडं तंग झालं होतं. त्यानंतर ईस्ट लीसेस्टर पोलिसांनी एक ट्वीट केलं होतं. त्यात लिहिलं होतं की,”आम्हाला नेहमीप्रमाणेच आता नवरात्री आणि दिवाळीसाठी सज्ज व्हावं लागणार आहे. सगळ्याच समाजातील लोक त्यादिवसांत सेलिब्रेशन करत असतात तर आम्हला तैनात राहवं लागत.

पोलिसांच्या याच ट्वीटला रीट्वीट करतअग्निहोत्रींनी लिहिलं आहे- ”कोणी विचार केला होता की एक दिवस असाही येईल की हिंदू समाजाला आपल्या सगळ्यात मोठ्या सणांना साजरं करण्यासाठी पोलिस सुरक्षेची मदत लागेल. हे फक्त एकाच गोष्टीकडे बोट दाखवत आहे की,दुश्मन आपल्या आजुबाजूलाच आहे, हिंदू सण तोंडावर आणि संकट समोर उभं ठाकलंय” असं अग्निहोत्री यांनी केलं आहे.

काही शब्दात सांगतो की लीसेस्टरमध्ये हिंदू मंदीरावर हल्ला झाला होता, ज्याची झळ बर्मिंगहम पर्यंत पोहोचली होती. भारतानं या घटनेची मोठी निंदा केली आहे. तसंच हा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर उचलून धरला आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले आहेत की,”आम्ही या प्रकरणाची सर्वोतोपरे चौकशी युद्धपातळीवर करत आहोत. यासाठी ब्रिटनच्या संपर्कातही आमचा अधिकारी वर्ग आहे. पुढे होणाऱ्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी आणि आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी राजकीय आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत”.

हे ही वाचा:

” …… जिंदाबादचे नारे लावले”, तर ते परत घरी जाणार नाहीत ; नितीश राणे

Video : नवरात्र निमित्त दादरमध्ये स्वस्त दरात मस्त साड्या किंमत ५००/- रुपये पासून सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss