spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे; मनोज जरांगेंची टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अजय बासरकर (Ajay Basarkar) यांनी टीका केली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अजय बासरकर (Ajay Basarkar) यांनी टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मनोज जरांगे म्हणाले, अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज आहे, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. बावळटकर बाबाला उत्तर सुद्धा देणार नाही, काय बोंबलायचं ते बोंबल, अन्यथा याला वेगळं वळण लागू शकतं, असे मनोज जरांगे म्हणाले. सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी,अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे.

मराठा समाजाचे वाटोळे करू नका. जर मी तुकाराम महाराजांबद्दल बोललो असल्यास माफी मागतो. हवं तर तोंडावर मारून घेतो. पण बारसकारांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव अजय बारसकारांचा आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. सरकारचा ट्रॅप सुरु झाला असून सरकारने ट्रॅप बंद करावेत. अजून १६ ते १७ ट्रॅप असून सरकार यांना मायाजाळ्यात अडकवत आहे, आमिष दाखवून भुलवत आहे. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होतं, ते मिळाले नसेल. मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबत आला होता. आतापर्यंत त्यांना मी ६ महिने गोड होतो. त्यांना ट्रॅप करायचा होता, त्यात शिंदे साहेबांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे साहेबांचा प्रवक्ता देखील आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता, असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे आंतरवली सराटी मध्ये पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन होणार आहे. तसेच आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांनी आमच्या घरासमोरून जायचे नाही, असे देखील सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे १ तारीखपासून वृद्ध नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोणी आमदार आमच्या मुलांवर जाणून बुजून अन्याय करेल, तर त्याला जाब विचारला जाईल, असे देखील जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

पुणे पोलिसांकडून कुपवाडमध्ये मोठी कारवाई, ४ हजार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत होणार ‘या’ खलनायिकेची एन्ट्री ,प्रोमो झाला आउट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss