आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात Ajit Pawar यांचे आवाहन

मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात Ajit Pawar यांचे आवाहन

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, तसेच विधानसभा सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष नार्वेकर यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

आठ हजार ६०९. १७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार ६०९. १७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक २०२४ मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक २०२४ आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक २०२४ मांडले.

आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होते. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२४ ते १ मार्च २०२४

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी दोन वाजता मांडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२४ ते १ मार्च २०२४ या कालावधीत होणार असून, एकूण पाच दिवस कामकाज चालणार आहे. अंतिम अर्थसंकल्पात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ या चार महिन्यातील महत्त्वाच्या खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते आणि व्याज यासोबतच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्ताव आणि विनियोजन विधेयकाला मान्यता देण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

मला नोबेल प्राईज मिळावे असे केजरीवाल का म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version