spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विदर्भासह मराठवाड्यातील अतिवृष्टी भागात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई : जुलै महिन्यातील सुरुवातीच्या दिवसात राज्यभरात पावसाने दुमाकुळ घातला होता. मराठवाड्यासह विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी त्रासले आहेत. अशात आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच यासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशषन बोलवावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. या संदर्भात अजित पवार त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

पूरग्रस्त जिल्हे व तालुक्यांमध्ये शेतांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अजित पवार यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले…

पावसामुळे शेतपिके वाहून गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणे, खते यांचे नुकसान झालेले आहे. आजपर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा : 

शिवसेने नंतर राष्ट्रवादीला धक्का, सोलापूर मधील दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला

आधीच या दोन्ही भागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने आणि आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये आणि राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे. विरोधी पक्ष येते यांनी राज्य सरकारला आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे.

सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्हीही पाणी पितात का? ही सवय त्वरित दूर करा

Latest Posts

Don't Miss