spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्यासाठी अजित पवारांनी दिले निर्देश, मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची (Pune Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक लहू माळी यांनी त्यांना माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून राज्यातील प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेतली तसेच बचाव व मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss