spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही: Ajit Pawar

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वरून (Ladki Bahin Yojana)  सध्या महाराष्ट्रात बरेच राजकारण होताना दिसत आहे. एकीकडे सत्ताधारी या योजनेचे कौतुक करताना दिसत आहेत. तर, विरोधक या योजनेवरून राज्यातील तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त भारावरून महायुती सरकारवर (Mahayuti Government) टीका करत आहेत. वित्त विभागाकडूनही याला विरोध असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या. अश्यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (शनिवार, २७ जुलै) आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले असून सर्व आरोप फेटाळले आहेत.

अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून याबाबत म्हंटले, “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.”

“चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.”

“काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया….”

शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा खास किस्सा, जावई नेमका कसा शोधला?

बॅनर लाऊन मुख्यमंत्री होता येत नाही, जनतेच्या मनात असावं लागत, Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss