पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी, अजित पवारांची राज्यपालांना विनंती

पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी, अजित पवारांची राज्यपालांना विनंती

अजित पवारांची राज्यपालांना विनंती

मुंबई : गेल्या जुलै महिन्यात राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 115 च्या वर नागरिकांचा निष्पाप बळी गेला आहे. तसेच जनावरे यात दगावली आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा सरकारने तातडीने अतिवृष्टीचे पंचनामे करावे व तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीस गेले होते. गेले अनेक दिवस अजित पवार महाराष्ट्र दौरा करत आहेत. प्रत्येक्ष रित्या त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा केली. त्यांचा अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

Ajit pawar Live: पूरग्रस्तांची चिंता सरकारला नाही ; अजित पवार

आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, “शिंदे सरकार अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असल्याचे सांगत आहे. पण मुख्यमंत्री हे विविध भागात जाऊन सत्कार घेण्यातच व्यस्त आहे. दिल्लीला गेले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगत आहे. सरकार स्थापन होऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. लवकर विस्तार करा, असे अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

हेही वाचा : 

डोंबिवलीत शिवसेना शाखेत ठाकरे पिता-पुत्राचा फोटोकाढून, शिंदे पिता-पुत्राचा फोटो लावण्यावर दोन गटात वाद

Exit mobile version