Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या कुटुंबीय आणि वकिलाच्या जीविताला धोका, पोलीस संरक्षणाची केली मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या कुटुंबीय आणि वकिलाच्या जीविताला धोका, पोलीस संरक्षणाची केली मागणी

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना सोमवारी (२३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अक्षयच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल करून हे एन्काउंटर फेक असल्याचा दावा केला आहे. त्यावरून काल (बुधवार, २५ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांवर गंभीर सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता याप्रकरणात नवीन अपडेट येत असून अक्षय शिंदे याचे कुटुंबीय आणि वकील यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण न्यायालयात आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी चार्टशीटसाठी अर्ज दाखल केला आहे. अक्षय शिंदेचे काका, आई-वडील आणि वकील या सर्वांनी कोर्टात हा अर्ज सादर केला आहे. यावेळी पोलिसांकडून त्याच्या दफनविधीबाबत फोन आला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. अक्षय शिंदे त्यांचा मृतदेह दफन करण्यात येणार असून बदलापूर येथील दफनभूमीत त्याचा दफनविधी होणार आहे. याचबरोबर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांसह त्याच्या वकिलांसाठी संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अक्षय शिंदेंचे वकील अमित कटारनवरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “दफनभूमी साठी जागा मिळत नाही याबाबत न्यायालयात सांगितले मात्र काल तसं काही घडले नाही. अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना आज दफनभूमीची जागा बघण्यासाठी पोलिसांनी बदलापूर येथे बोलावलं आहे. दोन तीन जागांची पाहणी करणार आहेत. किरीट सोमय्यांना ज्या प्रकारे पटकन संरक्षण दिलं जाते तर मग अक्षय शिंदे यांच्या कुटुंबीयांना देखील संरक्षण देण्यात यावे. मला सुद्धा सोशल मीडियावर अनेक कमेंट येत आहेत, त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. म्हणून मला देखील संरक्षण मिळावे. शाळेतील मुख्य आरोपी अजूनही फरार असून हे सरकारचे अपयश आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Sanjay Raut यांना १५ दिवसांची कैद, कोर्टाच्या निकालानंतर Medha Somaiya यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version