spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: फरार आरोपी BJP शी संबंधित, प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न: Anil Deshmukh

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठे भाष्य केले आहे.

अनिल देशमुख यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केले. याचवेळी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “ज्या शाळेत अत्याचाराची ही घटना घडली, ती शाळा भाजपशी संबंधित व्यक्तीची होती… त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकार कडून झाला, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे…” असे मोठे वक्तव्य केले आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून आता सर्व राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

अनिल देशमुख यावेळी म्हणाले, “अक्षय शिंदे याचे दोन्ही हात बेड्याने बांधलेले असताना, तो पोलिसांची रिव्हॉल्वर काढून घेऊन गोळ्या कश्या झाडू शकतो? याच्यावर विश्वास बसत नाही.. ज्या शाळेत अत्याचाराची ही घटना घडली, ती शाळा भाजपशी संबंधित व्यक्तीची होती… त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकार कडून झाला, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे… त्यामुळे आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरण दाबण्याचा दुसरा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचे दिसून येत आहे.. अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यासारखे नाही, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाचे मार्फत ही चौकशी झाली पाहिजे, तरच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल,” असे ते यावेळी म्हणाले.

बदलापूर प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला असला तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार साहलेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही आरोपी अजूनही फरार असून यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss