Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Akshay Shinde Encounter: आपटेला वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे – Satej Patil

बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मात्र ज्या पद्धतीने एन्काउंटरची घटना घडली यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मात्र ज्या पद्धतीने एन्काउंटरची घटना घडली यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद सढळ तेव्हा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

बदलापूर घरटनेतील आरोपीला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळं बोलत आहेत हे संयुक्तिक नाही. आपटेला वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे. शिवाय सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आलं होतं. ४५० पानाच चार्जशीट फाईल झालं होतं मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आलं होतं? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती? असे अनेक प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.

अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा चुकीचा आहे आणि याहून वाईट म्हणजे गृह खाते सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी आरोपी गाडीमध्ये बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि फायर करतो हे गृहखात्याची नामुष्की आहे. पोलीस आरोपीला सांभाळू शकत नाही आणि योग्यरीत्या खबरदारी घेऊ शकत नाही ही गृह खात्याची नामुष्की आहे. एन्काऊंटर झालं की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात, यावरून संशयाचा वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवरून गृह खात्याची इमेज कशी होत आहे हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. चौकशी हा विषय नाही हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडल्या हे समोर येणे गरजेचे आहे यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लावला.

आरोपी अक्षय शिंदेची एन्काउंटरची घटनेची चौकशी हा विषय नाही तर हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडल्या हे समोर येणे गरजेचे आहे. एस्कॉर्ट करणारी टीम किती जणांची होती हे समोर येणं गरजेचं आहे त्या टीममधल्या लोकांनी समोर येऊन काय घटना घडली सांगायला हवा. तरच गृह खात्यावरील विश्वास कायम राहील. सत्ताधारी पक्ष आमच्याबद्दल काहीही बोलत आहे मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेचे आहोत. यामध्ये गृहखात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपटे अद्याप का सापडले नाहीत त्यांना शोधण्याचा गृहखातं का प्रयत्न करत नाही ? त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत आणि क्रेडिट घ्यावे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी ही होत आहे. फडणवीस यांनी बदलापूर घटना, अंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते. त्यांच्याकडून अनेक कृत्य घडलेले आहेत मात्र ते राजीनामा देत नाहीत. प्रोटोकॉल पाळले होते का हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे तर संभ्रमावस्था कमी होईल.

त्यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्राला मान शरमेने खाली घालावी लागली. या घटनेचा समर्थन पाठराखण कोणीही करत नाही. मुख्यमंत्र्यांनी आपटे ना अटक का झाले नाही याचे उत्तर द्यावं. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. भाजप एक संघ ठेवू शकत नाही हे दिल्लीच्या नेतृत्वाला कळालेले नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्राचे वारंवार दौरे करावे लागत आहेत. अशी टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

हे ही वाचा:

Akshay Shinde च्या एन्काऊंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी करत मविआला डिवचलं, ‘बदला पुरा’..

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss