Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Akshay Shinde Encountar: अक्षय शिंदे याला संपवले म्हणून हे प्रकरण संपत नाही, या प्रकरणात कोणाला वाचवलं जातय? Sushma Andhare यांचा सवाल

Akshay Shinde Encountar: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यावर आता शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मोठे भाष्य केले आहे. सुषमा अंधारेंनी याप्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित करत झालेल्या एन्काउंटरवर शंका उपस्थित केली जात असल्याचं म्हंटल आहे.

सुषमा अंधारे यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून राज्य सरकारसह पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता,’ असा आरोप त्यांनी यावेळी पोलिसांवर लावला.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

माध्यमांशी संवाद साधत सुषमा अंधारे म्हणाल्या, “अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता. अक्षय शिंदे तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्रा कडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं गेलं? ज्या पिस्तूल ने अक्षय वर गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. अक्षय शिंदे याला पिस्तूल चे कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढलं जातं,” असे वक्तव्य करत त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, “संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. अक्षय शिंदे गतिमंद होता असे पोलिसांनी सांगितलं होतं तर मग तो एवढा हुशार कसा निघाला? संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हाथ होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. हा माणूस सस्पेंड होता. अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हेप्रकारां संपत नाही. कोणाला वाचवलं जात आहे? हि संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे. अक्षय शिंदे प्रकरणावर आम्ही कोर्टात जाणार. ३००२ किंवा ३०१४ मध्ये तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार, ” असे त्या यावेळी म्हणाल्या.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version