spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: Akshay Shinde चा Encounter करणारे Sanjay Shinde आहेत तरी कोण?

Akshay Shinde Encounter: बदलापूरमध्ये आदर्श विद्यामंदिर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवार २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून तळोजा कारागृहातून ठाणे येथे घेऊन जात होते. यादरम्यान आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावली. आरोपीने बंदुकीतून तीन राउंड फायर केल्या. यादरम्यान झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा येथील शासकीय रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. अक्षय शिंदेंवर गोळीबार करणारे संजय शिंदे हे नेमके कोण आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

बदलापूर (Badlapur) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) वर गोळी चालवणारे इन्स्पेक्टर संजय शिंदे (Sanjay Shinde) यांची कारकीर्द मोठी आहे. संजय शिंदे हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. याआधी त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षात काम केले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केले आहे. १९८३ मध्ये पोलीस दलामध्ये दाखल झालेले प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनी आपल्या कारकीर्दीत १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचा सामना केला आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर (Iqbal Kaskar) याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचा समावेश आहे.

संजय शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वाद झाले होते. खुनाचा आरोप असलेला विजय पालांडे हा पोलीस चौकशी दरम्यान पोलीस कोठडीतून पळून गेला होता. त्याला मदत करण्याचा आरोप सुद्धा संजय शिंदे यांच्यावर लावण्यात आला होता. संजय शिंदे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता यामुळे या प्रकरणात त्यांचं महत्त्व वाटलं होतं. अक्षय शिंदे (Akshay Shinde) ला तपासासाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला असता, अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराज यांचे नाव देणे, ही सर्वांचीच भावना- Murlidhar Mohol

Akshay Shinde Encounter: जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला अखेर मिळालीच- MNS Raju Patil

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss