वन्यप्राण्यांकडून सर्व पिकांची होतेय ‘लूट’

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आधीच शेतकरी(Farmer) संकटात असताना, आत त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभं राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेले कोवळे पिकं हरण(Deer), रोही(Rohi), उदबिल्ला(Udbillah), रानडुक्कर(Wild Boar), नीलगाई (Nilgai), मोर(Peacock) आदी वन्य प्राणी (Wild Animals) नासधूस करत पीक फस्त करत आहे.

वन्यप्राण्यांकडून सर्व पिकांची होतेय ‘लूट’

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आधीच शेतकरी(Farmer) संकटात असताना, आत त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभं राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेले कोवळे पिकं हरण(Deer), रोही(Rohi), उदबिल्ला(Udbillah), रानडुक्कर(Wild Boar), नीलगाई (Nilgai), मोर(Peacock) आदी वन्य प्राणी (Wild Animals) नासधूस करत पीक फस्त करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. तर वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जून(June) महिना कोरडा गेल्यावर जुलै(July) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक झालेल्या या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिकं उगवली असून, आणखी पावसाची अपेक्षा आहे. तर सध्या कपाशी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद ही पिके उगवून आली आहे. मात्र, या कोवळ्या अंकुरांवर वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास हल्ला करत पिकं फस्त करत आहे. त्यामुळे रात्रीतून शेतातील पिके गायब होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभं राहत आहे. आधीच पाऊस नाही त्यात आता वन्यप्राणी यांच्या धुडगूसमुळे बळीराजा हतबल झाला आहे.

सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान…

सिल्लोड(Sillod) तालुक्यातील अंधारी(अंधारी) गावात आणि परिसरात नुकत्याच उगवून आलेल्या पिकांच्या कोवळ्या अंकुरांवर हरण, रोही, उदबिल्ला, रानडुक्कर, नीलगाई, मोर आदी वन्य प्राणी डल्ला मारताना पाहायला मिळत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, या वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अंधारी परिसरातील माळ, जिभाळा शिवार, बेटाचा मळा, झाडी वस्ती, कानिफनाथ मंदिर परिसर, सासू- सुनेचे बरड परिसर आदी परिसरांतील शेतातील पिकांमध्ये वन्यप्राणी असाच धुडगूस घालतांना दिसत आहे.

शेतकरी संकटात…

यंदा मान्सून(Monsoon) उशिराने दाखल झाल्याने जून महिना अक्षरशः कोरडा गेला. जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. आता जुलै महिना देखील संपत आला आहे. अशात पिकांना पावसाची गरज आहे. मागील दोन-चार दिवसांत झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळाले आहे. पण अशात मोठा पाऊस न झाल्यास पिकं धोक्यात येऊ शकतात. एकीकडे पावसाची चिंता आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या त्रास पाहता, सांगा बर शेतकऱ्यांनी कसं जगावं असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वन विभागाने अशा वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा:

ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर २६ जुलैपर्यंत तूर्तास स्थगिती

अंबानी कुटुंबाच्या अँटिलियाचे ते एक रहस्य तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

यंदाच्या गणेशोत्सवाच्या नेमक्या मागण्यांबाबत शिफारसी कोणत्या?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version