Sunday, July 7, 2024

Latest Posts

Manoj Jarange Patil हे एक लढाऊ नेतृत्व, Ambadas Danve घेणार भेट

शिवसेना उबाठा नेते (Shivsena UBT) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य करत, 'मनोज जरांगे पाटील हे एक लढाऊ नेतृत्व असल्याचे सांगितले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) वादळ महाराष्ट्रात पुन्हा सुरु झाले आहे. मराठा आंदोलक मनोज अरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाची तलवार उपसली असून आज (गुरवार, १३ जून) अंतरवली सराटी (Antarwali Sarati) येथे आमरण उपोषणाचा (Hunger Strike) सहावा दिवस आहे. अश्यातच शिवसेना उबाठा नेते (Shivsena UBT) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य करत, ‘मनोज जरांगे पाटील हे एक लढाऊ नेतृत्व असल्याचे सांगितले आहे.

यावेळी, अंबादास दानवे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन सुरू आहे याचा आदर करायलाच पाहिजे. वाशी येथे आंदोलनादरम्यान मोठा गुलाल उधळून जो आदेश दिला होता त्याचं पुढे काय झालं हा प्रश्न जरांगे पाटील यांचा आहे. सरकारने निवडणुकी तोंडावर अशाप्रकारे धुळफेक केली का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मनोज जरांगे पाटील हे एक लढाऊ नेतृत्व असल्यामुळे म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी चाललो आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जो लाठीचार्ज झाला होता, त्याचं काय झालं? सरकारने किती वेळा सांगितले गुन्हे मागे घेणार परंतु घेतले का, मराठा बांधवांवर हा अन्याय का अत्याचार का?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी ते म्हणाले, “खरं तर ह्या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे, सगळ्यांचा जातीय सलोखा महाराष्ट्रात राहिला हवा. जो लढा एखादा समाज करत असेल तर समाजा सोबत राहण्याची आवश्यकता आहे. विदर्भात सर्वच मराठे कुणबी आहेत. पश्चिम महाराष्ट्र देखील सर्व मराठे कुणबी आहेत तसंच मराठवाड्यात देखील असावे अशाच प्रकारे त्यांची मागणी आहे. त्यात ओबीसींचा काय प्रश्न आला उलट ओबीसी ने स्वागत करायला हवे ओबीसींची संख्या वाढेल.”

“सरकार फक्त धूळ फेक करतं, कुठलाही निर्णय घेत नाही दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समतोल नाही यामुळे मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस होत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

OBC लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम BJP करत आहे, Nana Patole यांचा घणाघात

राज्यसभेसाठी Sunetra Pawar यांचं नाव असल्याने Chhagan Bhujbal यांची नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss