तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा, तब्ब्ल ८ धमकीचे फोन कॉल

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तब्ब्ल आठ वेळेस धमकी दिली असल्याचे देखील समोर आले आहे.

तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा, तब्ब्ल ८ धमकीचे फोन कॉल

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तब्ब्ल आठ वेळेस धमकी दिली असल्याचे देखील समोर आले आहे. अँटिलिया प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे.

रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली, त्यानंतर रुग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. एकूण ८ धमकीचे कॉल आले होते असे देखील प्रथमदर्शनी समोर आले आहे . या घटनेचा पोलिस तपास सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे. रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आहे. त्यावरून हा व्यक्ती माथेफिरू असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :-

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

१०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील : किशोरी पेढणेकरांचा विश्वास

Exit mobile version