Sunday, June 30, 2024

Latest Posts

“हे भाग्य निरंतर माझ्या नशिबी असावं”;Supriya Sule यांच्या वाढदिवसानिमित्त Amol Kolhe यांची खास पोस्ट

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे(Amol kolhe) यांनी विशेष पोस्ट करत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

बारामती लोकसभा मतदारंघाच्या (Baramati Loksabha Contituties )विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांची लेक सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा आज वाढदिवस. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे(Amol kolhe) यांनी विशेष पोस्ट करत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहली आहे. त्यात ते असं म्हणाले,”आदरणीय ताई, आपल्या मार्गदर्शनाखाली संसदेत पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून आतापर्यंत आपलं बहुमोल मार्गदर्शन मिळणं हे खरंतर माझं भाग्य आहे. हे भाग्य निरंतर माझ्या नशिबी असावं, आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !”अशी पोस्ट शेअर करत त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. 

संसदेतील तो व्हिडिओ पोस्ट केला. त्यात,”पाठिशी कौतुकाची थाप देणाऱ्या भगिनी,स्वाभिमानासाठी लढणाऱ्या रणरागिणी, माझ्या बापावर जरं संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेक सुद्धा आपण बघतो. त्या लेकीचं प्रतिनिधित्व आणि जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा ठामपणे उभी आहे असा महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री ला विश्वास जर कोणाकडून मिळत असेल तर तो सुप्रिया सुळे यांच्याकडून मिळतो.. ज्या कारणासाठी खासदारांना संसदेत पाठवायचं असतं त्या कारणावर शंभर टक्के खरं कोण उतरतं असेल तर त्या आदरणीय सुप्रिया ताई सुळे उतरतात”अशा आशयाचा संसदेतील व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss