spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमृत महोत्सव “आझादी गौरव” पदयात्रेला राज्यात प्रारंभ, प्रदेशाध्यक्षांचा सेवाग्रामच्या पदयात्रेत सहभाग

मुंबई : महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या आंदोलनात भाग घेतला नाही. जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरोधात लढत होता ते जे लोक इंग्रजाच्या बाजूने लढत होते आज देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना राष्ट्रभक्तीचा उमाळा आला आहे परंतु त्यांचे हे राष्ट्रप्रेम खोटे आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते करत आहे.

स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्यांशी संबंधित कोणताही पक्ष वा संघटना यांनी सहभाग घेतला नाही. देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला होता. महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा नारा दिला होता त्यावेळी इंग्रजांनी गांधींची, पंडीत नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. पण देशातील सामान्य जनतेने हे आंदोलन हाती घेतले. अरुणा असफ अली या तरूणीने ऑगस्ट क्रांती मौदानात तिंरगा फडकवला. काँग्रेस पक्षाचे लाखो कार्यकर्ते चले जावो आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाचे या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. तिरंग्याखाली देश एक झाला असताना भाजपाची मातृसंस्था आरएसएस यापासून दूर राहिली. आज देशाचा जीडीपी घसरला आहे पण तो सावरण्याऐवजी डीपी बदलण्याला मोदी सरकार प्राधान्य देत आहे. अशी टीका वारंवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वाढून केली जात आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सोवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 75 किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाग्राम येथून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेला सुरुवात झाली. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही आजपासून आझादी गौरव पदयात्रेला प्रारंभ झाला असून १४ तारखेपर्यंत ही पदयात्रा सुरु राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष बुलढामा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव यात्रेत शेगाव येथून सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :

नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पला पैसा आता महाराष्ट्र पुरवणार ; नाना पटोले

Latest Posts

Don't Miss