spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दूध महागलं, अमूल व मदर डेरी दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ

गेल्या काही दिवसांपासून महागाईने शिखर गाठले आहे. पेट्रोल-डिझेल गॅस, खाद्यपदार्थ, खाद्यतेल याच्या वाढत्या किंमतीमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. या गोष्टीमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना पुन्हा एकदा महागाईने सर्वसामान्य नागरिकांना धक्का दिला आहे. जीवनावश्यक वस्तू दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरात सर्वात मोठी दूध डेरी अमूलने दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे. त्याचप्रमाणे मदर डेरी दुधाच्या किंमतीत आता दोन रुपयांनी वाढणार आहे. आज म्हणजेच बुधवार 17 ऑगस्ट 2022 अमूल दुधाच्या किंमती मध्ये दोन रुपयांनी वाढ होणार आहे. ही दरवाढीची घोषणा कंपन्यांनी अधिकृतरित्या जाहीर केली आहे. यामुळे नक्कीच ग्राहकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण बसणार आहे.

जम्मू काश्मीरात आयटीपीबी जवानांची बस दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मार्केटिंग विभागाकडून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. गुजरात मधील अहमदाबाद, सौराष्ट्र, दिल्ली एनसीआर पश्चिम बंगाल, मुंबई आणि इतर ठिकाणी दुधाच्या किमतीत 17 ऑगस्ट पासून वाढ होणार आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे व्रतवैकल्य मोठ्या प्रमाणात पाळले जातात. अशात दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे नागरिकांना याचा फटका बसणार आहे.

कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी एक मार्च 2022 रोजी दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली होती त्यावेळी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाईमुळे हे दर वाढवण्यात आले असल्याचे सांगितले होते आता कंपनीने म्हटले आहे की दुधाच्या एकूण ऑपरेशन आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेने पशुखाद्याच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे त्यामुळे जाहिरात विभाग खात्याने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील 3 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Latest Posts

Don't Miss