संतप्त बेस्ट बस कंडक्टरचे आज आंदोलन, ‘या’ निर्णयाचा केला विरोध

बेस्ट प्रशासनाने एक अजब फतवा काढला आहे. तिकीटाचं मशीन बिघडल्यास आता कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जातील, असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

संतप्त बेस्ट बस कंडक्टरचे आज आंदोलन, ‘या’ निर्णयाचा केला विरोध

बेस्ट प्रशासनाने एक अजब फतवा काढला आहे. तिकीटाचं मशीन बिघडल्यास आता कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जातील, असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचारी संतापले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याचा निषेध करण्यासाठी बेस्ट वर्कर्स संघटनेकडून मंगळवारी वडाळा आगारात निदर्शन करण्यात येणार आहेत.

बेस्ट प्रशासनाने तिकीट काढण्यासाठीच्या ईटीआय मशीनची देखभाल कऱण्याबद्दल एक परिपत्रक काढलं आहे. त्यामध्ये कंडक्टर आणि इतर ग्राऊंड स्टाफला मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिकीट मशीनच्या सुट्ट्या भागांचे दरही या पत्रकात दिले आहेत. तसेच ड्युटीच्या वेळेनंतर कंडक्टर किंवा ग्राउंड बुकिंग कर्मचार्‍यांकडून मशीन्स घेणार्‍या कर्मचार्‍यांनी मशीनच्या डिस्प्लेवरील प्लॅस्टिकचे फ्लॅप उघडे कापलेले आढळून आले आहेत, त्यामुळे ते साठवून ठेवताना डिस्प्लेच्या क्षेत्रावर परिणाम होतो. “याचा परिणाम केवळ मशीनच्या उत्पादनक्षमतेवर आणि दीर्घायुष्यावर होत नाही तर दीर्घकाळासाठी ते अकार्यक्षम बनवते. जर मशीन्स अकार्यक्षम असल्याचे आढळले तर, प्रचलित धोरण आणि दरांनुसार, सुटे भाग बदलण्यासाठीचे पैसे कर्मचाऱ्यांकडून वसूल केले जातील,” असे परिपत्रकात म्हटले आहे.

यामध्ये १५ पार्ट्स आहेत, त्यापैकी सर्वात महाग पार्ट म्हणजे मेन बोर्डचा खर्च ८ हजार ४३८ रुपये दाखवण्यात आला आहे. या पैकी कोणत्याही पार्टमध्ये बिघाड झाल्यास, त्याचा खर्च कंडक्टरच्या पगारातून कापून घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता बेस्टचे कर्मचारी संतप्त झाले आहेत. ते आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज वडाळा आगारात हे कर्मचारी बेस्ट प्रशासनाविरोधात निदर्शने करणार आहेत.

“तांत्रिक समस्या असल्याने कर्मचाऱ्यांना दंड करण्यात अर्थ नाही. त्यासाठी कंडक्टरला जबाबदार कसे धरायचे? हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही मंगळवारी वडाळा बस डेपोवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिकात्मक निषेध, प्रशासनाने निर्णय न बदलल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू, असे बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version