Anil Deshmukh नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनित देशमुख (Anil Deshmukh) आज यांना जमीन मिळाल्यानंतर अखेर ते आज पहिल्यांदा नागपुरात आले आहेत. तब्बल २१ महिन्यांनंतर अनित देशमुख हे नागपुरात (Nagpur) दाखल झालेत.

Anil Deshmukh नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनित देशमुख (Anil Deshmukh) आज यांना जमीन मिळाल्यानंतर अखेर ते आज पहिल्यांदा नागपुरात आले आहेत. तब्बल २१ महिन्यांनंतर अनित देशमुख हे नागपुरात (Nagpur) दाखल झालेत. आज अनिल देशमुख नागपुरात पहिल्यांदा येणार या दृष्टीने नागपुरात त्यांचं जंगी स्वागत हे करण्यात आलं आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून येत होते. नागपुरात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात देशमुखांचं नागपूर विमानतळावर स्वागत केलं. नागपूर विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख चांगलेच भारावले. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी अनिल देशमुख भावूक झालेले बघायला मिळाले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आल्याचा आरोप केला.

यावेळेस माध्यमांशी बोलत असताना अनिल देशमुख महाले आहेत की, “तब्बल २१ महिन्यानंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं होतं. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून मोठा आनंद झालाय. मी काटोल मतदार संघात नव्हतो. परंतु, मुलगा सलील हा कायम नागरिकांच्या संपर्कात होता, असे अनिल देखमुख यांनी नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर म्हटले.

अनिल देशमुख यांच्या आगमनामुळे नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. विमानतळावर दाखल होतात कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचं फटाके वाजवून, ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख भावनिक झाले. कार्यकर्त्यांच प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. जंगी स्वागताबद्दल अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एक जिप्सी फुलांनी सजवली आहे. याच जिप्सीने अनिल देशमुख यांची नागपूर विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत रॅली निघणार आहे. विशेष म्हणजे या रॅलीनंतर अनिल देशमुख यांच्या घराजवळ त्यांचं आणखी जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या घराबाहेर फुलांनी भरलेली क्रेन ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

Ravindra Jadeja वर करण्यात आली कारवाई, भारताच्या विजयी खेळामध्ये आयसीसीने टाकला मिठाचा खडा!

IND vs PAK T20, उद्या रंगणार महिला विश्वचषकात भारत-पाकिस्तान मुकाबला, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version