प्राणीप्रेमी सावधान !भटक्या कुत्र्यांवर कारवाईचे निर्देश,कारवाईत अडथळा आणल्यास अटक केली जाईल

प्राणीप्रेमी सावधान !भटक्या कुत्र्यांवर कारवाईचे निर्देश,कारवाईत अडथळा आणल्यास अटक केली जाईल

आता नागपुरात भटक्या कुत्र्यांसंदर्भात प्राणीप्रेमींच प्रेम अंगलट येऊ शकतं. कारण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्या संदर्भात काल २०ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (High Court) २००६ पासून भटक्या कुत्र्यासंदर्भात प्रलंबित असलेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान महापालिका आणि पोलिसांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार मोकाट कुत्र्यांवर कारवाई करताना प्राणीप्रेमींनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यवर कारवाई करण्याचे निर्देश जरी केले आलेत.

तसेच भटक्या कुत्र्यांवर दयाभाव दाखवत रस्त्यावर, सार्वजनिक स्थळावर अन्न खाऊ घालता येणार नाही. तसे केल्यास २००रुपयांचा दंड होईल. ज्या प्राणीप्रेमींना कुत्र्यांना खाऊ घालायचे असेल त्यांनी महापालिकेकडे नोंद करुन, रीतसर परवाना घेऊन कुत्र्यांना घरात नेऊन खाऊ घालावे असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहे.

तसेच एखाद्या परिसरातील नागरिकांची भटक्या कुत्र्यांसंदर्भात तक्रार असेल तर महापालिका आणि स्थानिक पोलिसांनी त्यासंदर्भात कारवाई करावी. महापालिकेने पोलिसांच्या मदतीने सेक्शन ४४ अंतर्गत भटकी कुत्रे दिसल्यास त्यांचावर करवाई करावी. भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाई दरम्यान महापालिका आणि पोलिसांच्या कामात कोणी (प्राणीप्रेमी ) अडथळा आणत असल्यास त्यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर ठेवण्यासाठी शेल्टर होमच्या जागा निश्चित कराव्या. भटक्या कुत्र्यांसंदर्भात नागरिकांना तक्रार करायची असल्यास महापालिकेने समाज माध्यमांवर सोय उपलब्ध करुन द्यावी असे ही खंडपीठाने बजावले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या हैदोसासंदर्भात विजय तालेवार यांनी २००६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणी दरम्यान कुत्र्यांवर आवर घालण्यासंबंधीच्या उपाययोजना, कुत्र्यांचे लसीकरण, रेबीज इंजेक्शन याबाबत काय स्थिती आहे, याची माहिती सादर करण्याचे नमूद केले होते. त्यानुसार, नसबंदीसाठी आश्यक असलेला 17 कोटींचा निधी शासनातर्फे देण्यात आला नसल्याची बाब महानगरपालिकेतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानुसार येत्या आठवड्यांमध्ये राज्य शासनाने महानगरपालिकेला हा निधी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली. तर महानगरपालिकेतर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली होती .

शहरातील धंतोली परिसरात वाढलेल्या मोकाटकुत्र्यांच्या त्रासापाई धंतोली नागरिक मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेत मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज मान्य करत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेला दिले.

 

हे ही वाचा:

नवनीत राणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी! बोगस जातपडताळणी राणांना पडणार भारी

पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच, मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर ३ गंभीर जखमी

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version