समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा आणखी एक अपघात

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महामार्गावरील सुरू झालेली अपघातांची मालिका थांबतच नाही. कारण महामार्गावर एवढ्या वेगाने गाड्या धावत असतात की, त्यांना कंट्रोल करणे देखील मुश्किल होऊन बसते. आजही महामार्गावर भीषण अपघात झाला.

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा आणखी एक अपघात

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महामार्गावरील सुरू झालेली अपघातांची मालिका थांबतच नाही. कारण महामार्गावर एवढ्या वेगाने गाड्या धावत असतात की, त्यांना कंट्रोल करणे देखील मुश्किल होऊन बसते. आजही महामार्गावर भीषण अपघात झाला. ट्रकखाली कार चिरडली केली अन् काळजाचा थरकाप उडाला. अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनं इतकी वेगात होती की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ही ट्रकवर धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

ईनोव्हा कार शिर्डीहून नागपूरकडे जात होती. यावेळी कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. यावेळी समोरून मोठा ट्रक भरधाव वेगात आल्याने कार आणि ट्रकची जोरात धकड झाली. दोन्ही वाहनांचा वेग इतका जास्त होता की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली, अशी माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात गेल्या ३ दिवसांमधील हा तिसरा अपघात आहे. १८ एप्रिलला नागपूरचे माजी रणजीपटू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी क्युरेटर प्रवीण हिंगणीकर हे जखमी झाले. या अपघातात प्रवीण हिंगणीकर यांची पत्नी जागीच ठार झाली. हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला होता. यानंतर आणखी एक हा अपपघात झाला आहे.

हे ही वाचा : 

उदय सामंत गेले शरद पवारांच्या भेटीला

महिन्याच्या शेवटी महाराष्ट्राला बसणार अवकाळी पावसाचा फटका

राहुल गांधींच्या नव्या वक्तव्यामुळे फुटलं नव्या वादाला तोंड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version