राजन साळवी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, पत्नी आणि भावाला एसीबीची नोटीस

राजन साळवी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ, पत्नी आणि भावाला एसीबीची नोटीस

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या काही नेत्यांच्या मागे ईडी लागली आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), रवींद्र वायकर (Ravindra Waikar), राजन साळवी (Rajan Salvi) यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राजन साळवी यांच्या पत्नी आणि भावाला एसीबीची (ACB) नोटीस पाठवण्यात आली आहे. आज राजन साळवी यांच्या पत्नी आणि भाऊ यांना रत्नागिरीच्या एससीबी हजर राहण्याचे नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने त्यांच्या पत्नी आणि भावाला नोटीस पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि भाऊ दिपक साळवी यांचा जवाब नोंदवला जाणार आहे. हा जवाब नोंदवण्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या एससीबी कार्यलयात बोलावण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता त्यांच्या पत्नी आणि भावाला कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

सर्वसामान्य नागरिकांना सरकारचा झटका, LPG सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर…, अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version