दहशतवाद विरोधी पथकाची अनेक राज्यात कारवाई सुरु, पुण्यात दोन संशयीतांना अटक

दहशतवाद विरोधी पथकाची अनेक राज्यात कारवाई सुरु, पुण्यात दोन संशयीतांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयानं केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह १० राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पीएफआयच्या पुण्यातील कार्यालयावर एनआयए ने छापे टाकले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली असून पीएफआयच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आले आहे.

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे काही दिवसांपूर्वी PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आज पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान या दोघांना अटक करण्यात आले असून त्या दोघांना घेऊन पथक नाशिकला रवाना झाले आहे.

हेही वाचा : 

PM Cares Fund Trustees : पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी ‘या’ उद्योजकाची नेमणूक

तर देशात केरळ राज्यात एनआयएकडून सुमारे ५० ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ही संपूर्ण कारवाई टेरर फंडिंग प्रकरणावरून सुरू आहे. देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई सुरु आहे. केरळमधील मांजेरी, मल्लापुरम या भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहेत.

केरळमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. या छापेमारीमध्ये एनआयएसोबत ईडीचं एक पथकही हजर आहे. एनआयएने आतापर्यंत १०० हून अधिक पीएफआय अधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. याआधी एनआयएने बिहार आणि तेलंगणामध्ये छापेमारी केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या संदर्भात आणखी कारवाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळनंतर एनआयए पीएफआयच्या इतर राज्यांतील कार्यालयांवरही छापेमारी करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या १० राज्यांमध्ये ही कारवाई सुरू आहे. केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, यूपी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून पीएफआयच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेला आणखी एक धक्का; मुंबई पालिकेनं दोन्ही गटांची परवानगी…

पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. १९९३ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची स्थापना झाली. १९९२ मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली होती. तर या संघटनेचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का हे तपासण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून पुण्यातील PFIच्या कार्यालयाजवळ सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

Central Railway : दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड

Exit mobile version