अंतरवाली सराटी गावात पोहचताच मनोज जरांगे यांनी भुजबळ, सदावर्तेवर केली टीका, म्हणाले….

२६ जानेवारी २०२४ हा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी महत्वाचा दिवस आहे.

अंतरवाली सराटी गावात पोहचताच मनोज जरांगे यांनी भुजबळ, सदावर्तेवर केली टीका, म्हणाले….

२६ जानेवारी २०२४ हा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी महत्वाचा दिवस आहे. यादिवशी अखेर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईच्या दिशेने आंदोलन घेऊन आलेले मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात गेले आहेत. काल रात्री मनोज जरांगे पाच महिन्यानंतर आपल्या घरी परतले. मनोज जरांगेंच स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. ‘वाया गेलेल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका’ असा सल्ला मनोज जरांगे यांनी गावकऱ्यांना दिला.

दरम्यान, बोलताना मनोज जरांगे म्हणाले, यांचं ऐकायची गरज नाही. घटना तज्ञ काय म्हणतात हे महत्वाचे आहे. उल्हास बापट आणि उज्वल निकम यांची प्रतिक्रिया बघा. बाकीचे हे वाया गेलेली लोक आहेत, यांचे मनावर घ्यायची गरज नाही. कायदा पारित झाला झाला हा मराठ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आता करायचे असल्यास कोणीही चॅलेंज करू शकतो आणि न्यायालयमध्ये जाऊ शकतो. सगळ्या अध्यादेशाच्या आदेशाचे कायद्यात रूपांतर झाले म्हणजे मराठ्यांचा सातबारा पक्का झाला,असे जरांगे म्हणाले. गावकऱ्यांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, विश्वास बसत नाही एवढे मोठे कायदा पारित झाला. कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. घटनातज्ञानी जे मत मांडलाय त्यानुसार हे समुजन घेणे गरजेचे आहे. हा कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे. नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळाले आहे. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांनाच आरक्षण, असे कसे हा मोठा चॅलेंज माझ्यासमोर होता. कारण मी शब्द देऊन बसलो होतो. या शब्दात मराठ्यांचा किती हित आहे हे मी आधीच हेरल होते. आंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं नव्हतं. मी म्हणालो मुंबईच्या गल्ली गल्लीत जमा व्हा आणि खरंच मराठे गल्ली गल्लीत जमले. अहमदनगरच्या पुढे रोडच दिसला नाही. एवढ्या प्रचंड संख्येने लोकं होती. पुण्यात ६४ किलोमीटर लाईन होती, असे जरांगे म्हणाले.

लढा जिंकला, ५७ लाख लोकांना आरक्षण मिळाले. त्यानुसार अडीच लाख लोकांना फायदा मिळाला व आता कायदा पारित झाला. त्यामुळे उर्वरित मराठ्यांना देखील लाभ मिळणार आहे. आताही आमचं बोलणं झालं, फेब्रुवारीत अधिवेशन आहे. त्यावेळी कायदा पारित होणार आहे. आणखीन एक गोष्ट बांधून घेतली असून, मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या असल्याने शिंदे समितीची मुदत वाढ करण्याचं सांगितले आहे. या कायद्या विषयी कितीही गौरसमज झाले, तरी कुणीही चॅलेंज करू शकत नाही. मी सर्व अभ्यासक, तज्ञ, वकील बोलावले होते. सर्वांनी शब्दाचा किस पाडला व याला काहीच होऊ शकत नाही असे म्हटले. समाजासाठी हा कायदा खूप मोठा झाला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

Exit mobile version