Thursday, July 4, 2024

Latest Posts

“हाच मुलगा ज्याला मी कडेवर घेऊन फिरवलं होतं.”; आशा ताईंकडून लहानपणींच्या आठवणींना उजाळा

मला आठवलं की हाच मुलगा तोच ज्याला मी कडेवर घेऊन फिरवलं होतं. ६६ साली माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यावेळी देखील मी गात होते."असं म्हणत आशा भोसले (Asha Bhosale) यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या. 

पद्मभूषण पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, स्वरसम्राज्ञी, पद्मविभूषण अशा नावांनी सुप्रसिद्ध असलेल्या आशा भोसले (Asha Bhosale) यांच्यावरील ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे “स्वरस्वामिनी आशा” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडले. पार पडला. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांच्यासह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार(Ashish Shelar)यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf),गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha paudval) हे देखील उपस्थित होते. त्यावेळी दिग्गज संगीतकार सोनू निगम (Sonu nigam)यांनी आशा भोसले (Asha Bhosale) यांचे पाय गुलाब पाण्याने धूत त्यांचे पाद्यपूजन केले. आशा भोसले (Asha Bhosale) यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.

या कार्यक्रमात आशा भोसले (Asha Bhosale) यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आठवणी सांगितल्या. “लता दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम संपता कामा नये. मी घरातील तिसरी बहीण. आमचा एक पांडव गेला तरीही मी अजून आहे. मोगरा फुलला हे गाणं दीदीच्या मुखात खुप छान वाटतं होतं. तिने आम्हाला सांभाळलं आणि अजूनही सांभाळत आहे. मी जेव्हा ६० वर्षाची होते तेव्हा साडे अकरा गाणी गायली आहे. गिनीज बूक रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं.मी या वयात बोलणार नाही तर कधी बोलणार?थोडं सहन करा.”असं त्या म्हणाल्या.

पंडित ह्रदयनाथ मंगेशकर(Pandit Hrudaynath mangeshkar) यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, “ह्रदयनाथ माझ्याकडे ५६ मध्ये आला.ह्रदयनाथ माझ्याकडे येऊन म्हणाला की तु माझं गाणं गाणार का? असं म्हणताच मला आठवलं की हाच मुलगा तोच ज्याला मी कडेवर घेऊन फिरवलं होतं. ६६ साली माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यावेळी देखील मी गात होते.”असं म्हणत आशा भोसले (Asha Bhosale) यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss