लाडकी बहिण कार्यक्रमावर आशासेविका टाकणार बहिष्कार; काय आहे ‘ते’ कारण जाणूयात सविस्तर

लाडकी बहिण कार्यक्रमावर आशासेविका टाकणार बहिष्कार; काय आहे ‘ते’ कारण जाणूयात सविस्तर

विधानसभेच्या पार्श्ववभूमीवर राज्यात अनेक दौरे, उपक्रम, योजना यांचा राबता वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःची पोळी भाजून घेण्यास तत्पर आहेत. प्रत्येक पक्ष हा अगदी कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात.  त्यासोबत अनेक नेत्यांचे, पक्ष सादस्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे तर झालेच. ज्याचे पारडे जड तिथे अनेक पक्ष सदस्य, नेते यांचे स्थलांतरण होतच असते. या संपूर्ण गतिविधींवर बड्या किंवा वरिष्ठ नेत्यांचे लक्ष हे असतेच.  प्रत्येक पक्ष हा आपला उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीने विचार करत असतो. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. सर्वच पक्षांनी आपाआपल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अशातच आता आशा सेविका यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला जाण्यास नकार देऊन त्यावर बहिष्कार टाकणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. नागपूर (Nagpur) शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात आहे.

सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही :

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सी.आय.टी.यु)  बहिष्कारचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक ७ हजार व गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिवाळी बोनससह इतरही आश्वासनाचा पत्ता नाही. त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी कार्यक्रमात उपस्थित राहणार असून त्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. याच संदर्भात आशा सेविकांनी या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू असे संगितले आहे.

हे ही वाचा:

Exit mobile version