Ashadhi Ekadashi 2023, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात दाखल…

संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत.

Ashadhi Ekadashi 2023, वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपुरात दाखल…

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. दरवर्षी आषाढ महिन्यातील तेजस्वी चंद्राच्या ११ व्या दिवशी अनेक भक्त पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. अनेक संतांच्या पालख्या या आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त देखील अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरासाठी मार्गस्थ आहेत. यातच आता मानाची संत मुक्ताबाईं (Sant Muktaba) यांची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे.

मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेल्या संत मुक्ताबाई यांची पालखी आज पंढरपुरात पोहोचली आहे. आज (२६ जून ) दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान ही पालखी पंढरपुरात पोहोचताच वरुणराजाने पर्जन्यवृष्टी करत पालखीचं स्वागत केलं आहे. संत मुक्ताबाई यांच्या पालखीने तब्ब्ल गेल्या २४ दिवसात जवळपास ६०० किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. यंदा या पालखी सोहळ्याने वाट सरळ करताना ११ दिवसांचा पायी प्रवास केला आहे. संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात १२०० महिला आणि १००० पुरुष भाविक सामील झाले आहेत.

संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत. पालखी मार्गात अनेक अडचणी आल्या तरी विठुरायाच्या ओढीने यावर मात करीत हे भाविक आज पंढरपूरमध्ये पोहोचले. संत मुक्ताबाई या संत नामदेवांचे आजेगुरु असल्याने या पालखी सोहळ्याच्या स्वागताला संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराज आधीच पोहोचले होते. सोबतच ‘तुकोबाची अंभगवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळामधुनी गायिले अभंग …, ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम..’ असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील अनेक दिंड्या पंढरपुरात लवकरच दाखल होणार आहेत.

हे ही वाचा : 

पंढरपूरच्या वारीला मटनाचा शाही बेत? मुख्यमंत्री KCR यांच्यावर अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप

कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले .. ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version