Ashadhi Ekadashi 2024: Central Railway चे भाविकांना खास गिफ्ट, सोडणार ६४ विशेष गाड्या

Ashadhi Ekadashi 2024: Central Railway चे भाविकांना खास गिफ्ट, सोडणार ६४ विशेष गाड्या

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूर (Pandharpur) येथे जात असतात. अश्यावेळी भाविकांना रेल्वेसेवा खूपच उपयोगी ठरते. अश्यातच, लाखोंच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जात येऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आषाढी एकादशीनिमित्त ६४ विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली असून यामुळे लाखो भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.

यंदा बुधवार, १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक येत असतात. त्यामुळे, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे वेळापत्रक

नागपूर – मिरज – नागपूर ४ सेवा
दि. १४, १५, १८ व १९ जुलैला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहोचेल

नवी अमरावती – पंढरपूर – नवी अमरावती ४ सेवा
दि. १३, १४, १६ व १७ जुलैला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहोचेल

खामगाव – पंढरपूर – खामगाव ४ सेवा
दि. १४ व १७ जुलैला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहोचेल
दि. १५ व १८ जुलैला सुटेल आणि त्याच दिवशी पोहोचेल

भुसावळ – पंढरपूर – भुसावळ २ सेवा
दि. १६ व १७ जुलैला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहोचेल

मिरज – पंढरपूर – मिरज २० सेवा
दि. १२ ते २१ जुलैला सुटेल आणि त्याच दिवशी पोहोचेल

मिरज – कुडूवाडी – मिरज २० सेवा
दि. १२ ते २१ जुलैला सुटेल आणि त्याच दिवशी पोहोचेल (१० सेवा)
दि. १२ ते २१ जुलैला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहोचेल (१० सेवा)

लातूर – पंढरपूर – लातूर १० सेवा
दि. १२, १५, १६, १७ व १९ जुलैला सुटेल आणि त्याच दिवशी पोहोचेल

राज्य सरकारकडून टोलमाफि जाहीर

एकीकडे मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेसुद्धा टोलमाफी करत भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना खास गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने पंढरपूरच्या दिशेने येणारी गर्दी पाहता २१ जुलैपर्यंत टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. तसेच, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-सोलापूर, सायन-पनवेल राजमार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-बँगलोर राष्ट्रीय महामार्ग यांच्यासहित पंढरपूर येथील रस्ते आणि राज्य महामार्ग यांची डागडुजी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

‘केदारनाथमधून २८८ किलो सोने गायब झाले’, अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा आरोप, पंतप्रधान मोदींच्या…

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य, ‘जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर…’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version