spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024 : Cm Eknath shinde यांनी आषाढी एकादशी निमित्त मागितले विठुरायाकडे साकडे

आज (१७ जुलै २०२४) आषाढी एकादशी म्हणजेच मोठी एकादशी या एकादशीला समूळ भाविक मेळा हा पंढरपुरात दाखल होऊन विठ्ठलाची आणि रुक्मिणीची भेट घेतात. त्याचप्रमाणे आपापली मनोकामना मागतात. असं म्हणतात आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला भेट देता आली पाहिजे. या दिवशी दर वर्षी विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा आयोजित केली जाते व या पूजेला मुख्यमंत्र्यांसाथीचा बहुमान दिला जातो. हाच मान सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्राप्त झाला आहे. ट्विटर या सोशियल मीडियाच्या माध्यमातून हे सुवर्णक्षण आपल्या कॅमेरात कैद करून एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे.

पंढरपूरमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्र्याबरोबरच, यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. “त्यांच्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला.” असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटर पोस्ट मध्ये लिहिले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठल- रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली. यावेळी त्याच्यासोबत त्यांच्या परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली असून १२ ते १५ लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपन्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाही पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त भीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रुक्मिणीमातेचा दुग्धाभिषेक करत हि पूजा पार पडली आहे. प्रसाद स्वरूप शिंदे यांना श्रीफळ, विठ्ठल-रुक्मिणी प्रतीमा व हार देण्यात आला. 

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाची शासकीय पुजा करण्याचं भाग्य मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येतात. सपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झालं आहे. सगळं वातावरण मंगलमय झालं आहे. शासकीय महापूजेवेळी राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनातील मुख्य अधिकारी वर्ग उपस्थित होता. लाखो वारकरी विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत. पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माऊली माऊली व हरिनामाचा गजर होत आहे. सर्व प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले सर्वांनी सहकार्य केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ.लता, मुलगा डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.

 यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे शिंदे यांनी मागितले. सोबतच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन साठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर १०३ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल. 

 

 

Latest Posts

Don't Miss