Ashadhi Wari 2023, श्री संत सोपानकाका पालखीचे प्रस्थान निघाले पंढरीस

संत सोपानकाका यांच्या पालखीचे आज दिनांक १५ जुलै २०२३ रोजी प्रस्थान झाले. विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत.सोपानदेव वयाने लहान असले तरी सुद्धा ते एक अध्यात्मातील पुरूष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक प्रगती साधलेली होती.

दुपारी १ वाजता देऊळ वाड्यातील सासवड मंदिरातून ही पालखी बाहेर पडली.काही काळ भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर संत सोपानकाकांच्या चलपादुका असललेली ही पालखी दरवाजाबाहेर पडली.ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची दाखल ही सासवडमध्ये होते . त्याच्याच दुसऱ्या दिवशी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते.मोठ्या गाजावाजात हा मिरवणूक सोहळा पुरंदर तालुक्यातील पांगरे या ठिकाणी आपला पहिला मुक्काम करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थनाला हजेरी लावत त्यांचे दर्शन घेतले . हा प्रवास १४ दिवसांचा असणार आहे. त्याचप्रमाणे हा सोहळा २८ जूनला पंढरपूर मध्ये पोहचेल.

वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणून संबोधले जाते. तर संत सोपानदेवांना सोपान काका असे आपुलकीने आणि प्रेमाने संबोधले जाते. पालखीच्या प्रस्थानाआधी सर्व मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात सन्मानित करण्यात आलं. यावेळी मंदिर संस्थानाकडून वारकरांना पुष्पहार, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती देण्यात आली.

संत सोपान काकांची पालखी देऊळ वाड्यातून बाहेर येताच ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा जयघोष झाला आणि फुलांच्या वर्षावात संत सोपानकाकांच्या नावाचा ही जयघोष करण्यात आला. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन गावभर नाचवली.यावेळी रस्त्यात अनेक सासवडकरांनी गर्दी केली होती. वारकऱ्यांच्या चरणावरती सासवडकरांनी माथा टेकल्या. तसेच वारकऱ्यांवर फुलांची उधळण देखील केली. संत सोपान काका यांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी सासवडकर यांनी बरीच गर्दी केली होती. हा संपूर्ण सोहळ्याचा योग हा तब्बल दोन वर्षांनंतर आला होता. अखेर सोपानकाका पंढरीच्या दिशेने रवाना झाले.

हे ही वाचा:

अजित पवारांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

राजू शेट्टी यांची एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version